Breaking News

आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत ‘के. बी. रोहमारे’चे यश


कोपरगाव शहर प्रतिनिधी :
काठमांडू (नेपाळ) येथे दिनांक २३ ते ३० यादरम्यान १९ वर्षाखालील मुलांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तेथील स्पर्धेत के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

गोपाळ पवन राजेंद्र महाजन, हर्षल संजय, पाटील मनोज यांच्या संघाने तेथील स्पर्धेत अंतिम सामन्यात उपविजेते पद मिळवून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.

उत्तुंग यशाबद्दल कोपारगाव तालूका सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, संस्थेचे सचिव विधिज्ञ संजीव कुलकर्णी, संस्थेचे संचालक संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी. आर. सोनावणे, कार्यालय अधीक्षक डॉ. ए. सी. नाईकवाडे, महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुनील कुटे व शारीरिक शिक्षक मिलिंद कांबळे यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.