Breaking News

जगाला शांतीचा संदेश देणारा धर्म इस्लाम

(मागील अंकावरून)
उत्तर दिले. हे ऐकुण कुरैश सरदार क्रोधीत होवुन परत फिरले. त्यांनी ठरवले की मुहम्मद (सल्ल.) व त्यांच्या अनुयायांचा छळ करू, त्यांच्यावर खुप अत्याचार करू जेणे करून ते नवा धर्म सोडुन पुन्हा आपल्या जुन्या धर्माचे पालन करतील. त्यानुसार काफीर सरदारांनी मुस्लीमांचा छळ सुरू केला. मात्र त्यांच्या प्रत्येक दृष्ट्कृत्यांना पैगंबरांनी सज्जनतेने व सदव्यवहारानेच उत्तर दिले.
सर्वच कबिले व सरदार त्यांचा अपमान करीत, त्यांना यातना देत. अमानुषपणे मुस्लीमांना त्रास दिला गेला.पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांच्या अनुयायांना भर उन्हात तप्त वाळवंटात उघडे झोपवीले जाई व चाबकाने मारले जात. वजनदार दगडाखाली त्यांना चेंगरले जात. लोखंडी सळई तप्त करून त्यांना डाग दिले जात. अनन्वीत अत्याचार करूनही मुस्लीम सत्य धर्माला सोडन्यास तयार नाहीत हे कुरैश सरदारांना कळुन चूकले. मुसलमानांचा कट्टर विरोधक अबू जहलने मुस्लीमांना खुपच छळले. त्यांचे जे गुलाम मुस्लीम झाले होते त्यांच्या वर खुपच अत्याचार केले गेले. पैगंबर मुहम्मद (सल्ल.)यांचे जिगरी मित्र अबु बक्र यांनी ते सर्व गुलाम खरेदी करून त्यांना गुलामीतुन मुक्त केले. व सन्मानाची वागणुक दिली.इस्लाम मध्ये अजिबात भेदभावाला थारा नाही. उच्च निच, गरीब श्रीमंत असा अजीबात भेद नसे. स्त्रीयांनाही विशेष अधीकार होते. स्त्रीयांचा आदर करन्याची शिकवण इस्लाम देत होता. हे विरोधकांना मान्य नव्हते. ते गुलाम व स्त्रीयांना तुच्छ मानत होते. मुस्लीमांना नमाज पठण करताना पाहुन कुरैश त्यांना त्रास देत, त्यांची खिल्ली उडवत. म्हणुन मुस्लीम लपून नमाज पढत व कुरआन पठण करत असे.
मक्का शहरातील काफीरांच्या (नास्तीकांच्या ) वाढत्या अत्याचाराने मुस्लीमांचे जगणे असह्य झाले. तेव्हा पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी आदेश दिला की हब्शा येथे जा. तेथील राजा न्यायी आहे. मुस्लीम मक्का सोडुन हब्शा राज्यात गेले. तेथे नज्जाशी नावाची ख्रिस्ती राजा होता. कुरैशांना ही गोष्ट कळताच त्यांनी आपले दूत राजाकडे पाठविले व मुस्लीमांना आमच्या हवाली करा असे सांगीतले. व नव्या इस्लाम धर्माविषयी सांगीतले. सर्व मुस्लीमांना कैद करून राजा समोर हजर करण्यात आले. राजा नज्जाशीने विचारले तुमचा कोणता असा नवा धर्म आहे की जो आम्हाला माहीत नाही? यावर हजरत जाफर (रजी.) म्हणाले की तुम्ही न्यायी आहात. आमच्यावर अन्याय होवु देणार नाहीत हे गृहीत धरूनच आम्हाला पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी आपल्या राज्यात पाठवले आहे. आम्ही पुर्वी खुप रानटी आयुष्य जगत होतो. वाईट व घाणेरडी कृत्ये करत होतो. शेजारी व आपआपसात भांडत होतो. अल्लाह ने आपला पैगंबर (संदेष्ठा) आमच्यात पाठवला. ज्याने आम्हाला सत्य धर्म इस्मालचे ज्ञान दिले. केवळ एकाच ईश्‍वराची भक्ती करा. निर्जीव मुर्तीची पुजा करू नका, सत्य बोला, शेजारी व सगे संबंधींबरोबर चांगला व्यवहार करा. न्यायाने वागा, अन्याय अत्याचार करू नका, व्याभीचार करू नका, अनाथ व दुर्बलांचे वाली बना, त्यांचा माल लुबाडु नका, स्त्रीयांना समान वागणूक द्या, त्यांच्यावर घाणेरडे आरोप करू नका. नमाज पढा व एकाच ईश्‍वराची उपासना करा. दान देत रहा. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांच्या या संदेशावर विश्‍वास ठेवुन आम्ही इस्लाम धर्म स्विकारला. या पुर्वीही अनेक पैगंबर आले होते. आपआपल्या कालखंडात त्यांनीही हाच संदेश दिला होता.
हजरत जाफर (रजी.) यांच्या या स्पष्टीकरणामुळे नज्जाशी खुपच प्रभावीत झाला व मुस्लीमांना आपल्या राज्यात सन्मानाने व समाधानाने राहु शकता असे सांगीतले. कु रैशच्या दुतांना रिकाम्या हाताने परत पाठविले. ही गोष्ट कुरेश च्या शुर सरदार हजरत उमरला कळाली. त्याने विचार केला की सगळ्या वादाचे मुळ कारण असलेल्या पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनाच संपवावे. या विचाराने उमर निघाले. वाटेतच त्यांना कळाले की त्यांच्या बहिणीने व मेव्हण्यानेही इस्लाम धर्म स्विकारला. त्यांचा समाचार घेन्यासाठी गेले असता तेथे त्यांना कुरआन ऐकावयास मिळाले. त्यांनीही तात्काळ इस्लामचा स्वीकार केला. मोठ्या गतीने इस्लाम धर्मीयांची संख्या वाढतच होती. कुरैशांकडुन पैगंबर मुहम्मद (सल्ल.) व त्यांच्या सहकार्यांचा छळ चालुच होता. पैगंबरांना वेगवेगळ्या प्रकारे छळले जात होते.त्यांच्या अंगावर घाण टाकली गेली. डोक्यावर माती टाकण्यात आली. नजरकैदेत ठेवन्यात आले. एकदा सत्य मार्ग लोकांना सांगण्यासाठी ते ताईफ या ठीकाणी गेले. तेथे त्यांना कुणीही आसरा दिला नाही. तेथील गुंडांना दगड घेऊन त्यांच्या मागे लावण्यात आले. दगडांचा वर्षाव त्यांच्यावर केला गेला.त्यांनी कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली. तरीही त्यांना शिव्या शाप न देता त्यांच्या भल्यासाठीच ईश्‍वराकडे प्रार्थना केली. कुरैश लोकांना ही गोष्ट कळताच ते खुष झाले व पैगंबरांवर हसु लागले.
पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी आपले कार्य चालुच ठेवले. अरबच्या इतरही लोकांना त्यांनी इस्लामची शिकवण दिली. मोठ्या संखेने लोकांनी इस्लाम धर्म स्विक ारला.मदिना शहरात मोठ्या संखेने त्यांचे अनुयायी तयार झाले. त्यांनी पैगंबर मुहम्मद (सल्ल.)यांच्या सुरक्षेची शपथ घेतली. पैगंबरांना व सर्व मुस्लीमांना मदीना नगरीतयेण्याचे आमंत्रण दिले. एक एक करून मुस्लीम मदीन्या कडे प्रयाण करू लागले. मक्केहुन मदीन्या कडे पायी 250 मील प्रयाण केले. या प्रवासातुनच हिजरी सन ची सुरूवात झाली. मदीन्यातील लोक मोठ्या संख्रेने इस्लामकडे आकर्षीत होवु लागले.
इकडे कुरैश व इतर काफीर जास्तच चिंतीत होवु लागले. (क्रमशः)