Breaking News

कंटेनर आणि स्कूल बसची जोरदार धडक होऊन भीषण अपघात

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माले फाटा इथं कंटेनर आणि संजय घोडावत स्कूल बसची जोरदार धडक होऊन अपघात झाला आहे. या अपघातात 2 जण ठार, तर २६ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

आज सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली असून जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी साडेआठ वाजता कोल्हापूरहून संजय घोडावत स्कूल अतिग्रे इथं विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला सांगलीहून कोल्हापूरकड जाणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली.यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर बसमधील ड्रायव्हर क्लिनरसह २६ विद्यार्थी जखमी झाले.