Breaking News

सदाभाऊ खोत यांना राजकीय धक्का


सदाभाऊ खोत यांना मोठा राजकीय धक्का मिळाला आहे. कारण रयतच्या प्रदेशाध्यक्षपदाचा सुरेश पाटील यांनी राजीनामा दिला आहे. रयत क्रांती संघटनेपासून पाटील यांचा काडीमोड घेतला आहे. त्यांनी नव्या मराठा क्रांती संघटनेची स्थापना केली आहे. आज शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये या नव्या संघटनेची घोषणा सुरेश पाटील यांनी केली आहे.राज्यातील 20 संघटना एकत्र येऊन नव्या संघटनेची स्थापना करणार येणार असल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. सुरेश पाटील यांच्याकडून नव्या संघटनेची घोषणा करण्यात आली आहे.