Breaking News

पाच दहशतवाद्यांचा खात्मा


श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात रविवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरक्षा दलाच्या जवानांनी उधळून लावला आहे. येथील केरन सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणार्‍या 5 दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातले असून परिसरात शोधमोहीम सुरू आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवरील केरन सेक्टरमध्ये काही दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांत जबरदस्त चक मक उडाली. यावेळी सुरुवातीला तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. त्यानंतर काहीवेळाने आणखी तीन दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी ठार केले आहे. रमजान महिन्यात सीमावर्ती भागात शांतता राहावी यासाठी भारताने सीमेवर गोळीबार न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पाकिस्तान ऐकायला तयार नाही. भारताच्या या निर्णयानंतरही दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. भारताच्या जवानांनी तो हाणून पाडला.
कुपवाडापासून 94 किलोमीटरवर केरान आहे. नियंत्रण रेषेवर असल्यामुळे हा संवेदनशील भाग मानला जातो. संरक्षण प्रवक्त्यांनी याबाबत निवेदन जारी केले की, कु पवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर घुसण्याचा प्रयत्न फोल ठरवला. त्यांनी सांगितले की सीमेपलीकडील घुसखोर करणार्‍या पाच दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. ही कारवाई अद्याप सुरूच आहे. दरम्यान, रमजानच्या महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये कोणतेही दहशतवादी हल्ले न करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते, पण पाकिस्तानकडून वारंवार घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.