बालभवनास पाण्याची टाकी
नेवासा शहर प्रतिनिधी- मा. आमदार शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त सोनई येथील शंकरराव गडाख पाटील मित्र मंडळच्या वतीने शहरातील स्माईली बालभवन येथे पिण्याच्या पाण्याची टाकी व बालभवनातील विध्यार्थ्यांना वही पेनचे वाटप करण्यात आले. यावेळी शनैश्वर देवस्थानचे उपाध्यक्ष नानासाहेब बानकर, कोषाध्यक्ष योगेश बानकर, सरचिटणीस दीपक दरंदले, राहुल पवार, सागर सोनवणे, नेवासा येथील विशाल सुरडे, निलेश जगताप, गणेश कोरेकर, हराळे सर, बाल भवनच्या कावेरीताई मापारी, नगरसेविका अंबिकाताई इरले, प्रतिभा तंटक उपस्थित होते.