महसूल विभागाचे काकासाहेब मते सेवानिवृत्त, डोल कमिटीच्या वतीने गौरव
नेवासाफाटा (प्रतिनिधी) - येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना कमिटीचे अधिकारी काकासाहेब मते हे 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले . सेवानिवृत्तीबद्दल त्यांचा डोल कमिटीच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.
यावेळी झालेल्या मासिक बैठकी प्रसंगी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, नायब तहसीलदार नारायणराव कोरडे, कमिटी सदस्य पत्रकार सुधीर चव्हाण, डॉ.लक्ष्मण खंडाळे, अँड. किशोर सांगळे, येडुभाऊ सोनवणे, लिपिक हरिदास पांढरे उपस्थित होते.
काकासाहेब मते यांनी पस्तीस वर्षाच्या सेवेत पाथर्डी, कोपरगाव, शेवगाव, श्रीरामपूरसह शेवटी नेवासा येथे सेवा केली. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक प्राप्त केलेल्या मते यांना उपस्थित मान्यवरांनी मनोगताद्वारे शुभेच्छा दिल्या. यानंतर महसूल विभागाच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात तहसीलदार उमेश पाटील, निवासी नायब तहसीलदार ज्योतीप्रकाश जायकर यांनी काकासाहेब मते यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.