पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श राज्यकर्त्या - आ. बाळासाहेब थोरात
संगमनेर ( प्रतिनिधी ) - पाण्याचे महत्व जाणून अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक ठिकाणी बंधारयासह विहीरी , बारव निर्माण केल्या. पुरोगामी विचार जपत जनतेच्या विकासासाठी अनेक लोककल्याणकारी योजना सुरु करणार्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या आदर्श राज्यकर्त्या होत्या असे प्रतिपादन काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
यशोधन येथे तालुका काँग्रेसच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, तालुकाध्यक्ष बाबा ओहळ, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, अजय फटांगरे, नवनाथ आरगडे, विश्वास मुर्तंडक, उपनगराध्यक्ष बाळासाहेब पवार, हौशीराम सोनवणे, के. के. थोरात आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार थोरात म्हणाले की, सर्व राष्ट्रपुरुषांचे जीवन हे देशासाठी व समाजासाठी समर्पित आहे. त्यांच्या त्यागातून व बलिदानातून आज आपण सुखी आहे. त्यांचे विचार जोपासत प्रत्येकाने आचारण केले तर खर्या अर्थाने देश पुढे जाईल. यावेळी शिवाजी गोसावी, ढोले गुरुजी, विलास कवडे, जगन्नाथ आव्हाड, ज्ञानेश्वर राक्षे, अॅड. अशोक हजारे, तात्याराम कुटे, एस.एम. खेमनर, चांगदेव खेमनर, भास्कर खेमनर, विजय राहणे, गणेश मादास, महेश वाकचौरे आदिंसह युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बाबा ओहळ यांनी केले. सुत्रसंचलन नामदेव कहांडळ यांनी केले. तर शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तंडक यांनी आभार मानले.