Breaking News

बाल हक्क आयोगाची राहुल गांधींना नोटीस

बीड : महाराष्ट्र बाल हक्क आयोगाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील मुलांना विहिरीत पोहल्यामुळे नग्न क रुन मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ राहुल गांधींनी ट्विटरवर पोस्ट केला होता. जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहायला गेलेल्या मुलांना नग्न करून त्यांना मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या घटनेसंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओही अपलोड केला. या व्हिडीओतून अल्पवयीन मुलांची ओळख उघड झाल्यामुळे राहुल गांधींना नोटीस बजावण्यात आली. या घटनेसंबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन चार आरोपींना अटकही करण्यात आली आहे. त्या आरोपींवर पॉक्सो अंतर्गत अ‍ॅट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या संदर्भात राहुल गांधी यांनी ट्वीट करून पीडित मुलांचा व्हिडिओ अपलोड क रुन बाल हक्क कायद्यानुसार उल्लंघन झालं असल्याची तक्रार बाल हक्क आयोगाकडे करण्यात आली.