Breaking News

शारदा घोटाळाप्रकरणी नलिनी चिदंबरम यांना ईडीचे समन्स


नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम यांना शारदा पोंझी घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) समन्स बजावण्यात आला आहे.यापूर्वी 30 एप्रिलला नलिनी यांना ईडीने समन्स बजावले होते. सप्टेंबर 2016मध्ये ईडीने नलिनी यांना आपल्या कोलकाता कार्यालयात साक्षीदार म्हणून हजर होण्यासाठी समन्स बजावले होते. सुदीप्त सेन यांनी शारदा घोटाळ्यात चेन्नईस्थित वरिष्ठ वकील असलेल्या नलिनी चिदंबरम् यांचे नाव घेतले. सुदीप्त सेन हे या शारदा चिटफंडाचे चेअरमन होते. काँग्रेस नेते मतांगसिंह यांच्या पत्नी मनोरंजना सिंह यांच्या हस्तक्षेपानंतर नलिनी यांना एक कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे.
कोलकतामध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास असताना नलिनी चिदंबरम् यांना एक कोटी रुपये देण्यात आल्याचा उल्लेख सीबीआयने दिलेल्या अहवालातही असल्याचे सांगण्यात आले आहे.