महापालिकेच्या शाळेला आयएसओ मानांकन
पुणे - महापालिकेची शाळा म्हटली दुय्यम दर्जाचे शिक्षण मिळते असा समज आहे. परंतू अजंठानगर येथील महापालिकेच्या शाळेने हा समज खोटा ठरवत हम भी किसीसे कम नही हे दाखवून देत आयएसओ मानांकन प्राप्त केेले आहे. राज्यशासनाचे सर्व निकषांची पूर्तता करुन अजंठानगर येथील माता रमाबाई भिमराव आंबेडकर प्राथमिक शाळा आयएसओ मानांकन प्राप्त क रणारी शहरातील दुसरी पालिकेची शाळा ठरली आहे.मानांकनासाठी राज्य शासनाने घालून दिलेल्या 24 निकषांची पुर्तता केल्याने अजंठानगर येथील शाळेला आयएसओ’ मानांकन मिळाले आहे. शहरात पालिकेच्या 106 शाळा असून दिवसेंदिवस काही शाळांमधील पटसंख्या घटत आहे. झोपडपट्टी परीसरातील शाळांमध्ये पटसंख्या सर्वाधिक आहे. हल्ली इंग्रजी माध्यमांकडे मुलांचा ओढा असल्याने महापालिकेच्या शाळांपूढे इंग्रजी शाळांनी मोठे आव्हान उभे केले आहे. परंतू हे आव्हान स्विकारुन पालिकेच्या शाळेत देखील गुणात्मक दर्जा राखला जातो. तसेच विद्यार्थ्याना सर्व सोयी पुरवल्या जातात हेच या शाळेने सिध्द केले आहे.
