Breaking News

पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पेरणी लांबली


सोलापूर - रोहिणी आणि मृग नक्षत्राच्या पावसाने सर्वदूर दमदार हजेरी लावली. त्यामुळे यंदाच्या वर्षी खरीप हंगामाचा चांगला पेरा होईल, या अपेक्षेने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या. पण, गेल्या आठ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पेरणी लांबली आहे.प्रामुख्याने रब्बी हंगामाचा जिल्हा अशी सोलापूरची सरकार दप्तरी नोंद आहे. पण, प्रत्यक्षात गेल्या अनेक वर्षांपासून खरिपाची मोठ्या प्रमााणात पेरणी होते. खरिपाचे सरासरी 79 हजार हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने निश्‍चित केले आहे. गेल्या वर्षी दोन लाख पेक्षा जास्त हेक्टरवर पेरणी झाली होती. चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने नोंदवल्याने शेतकर्‍यांनी मशागतीची कामे युद्धपातळीवर केली. रोहिणी, मृग नक्षत्राच्या पावसाने चांगली हजेरी लावल्याने खत, बियाणे खरेदीसाठी शेतक र्‍यांची लगबग सुरू होती. आणखी दोन चार मोठे पाऊस झाल्यानंतर पेरणीच्या तयारी शेतकरी होते. पण, गेल्या आठ दिवसांपासून पावसाने ओढ दिली. पेरणी करण्यासाठी आवश्यक ओलावा ज मिनीमध्ये नसल्याने पेरणी केल्याचा फायदा होणार नाही, त्यामुळे शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील पेरण्यांना सुरवात केली नाही. जिल्ह्यात सध्यापर्यंत 46 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.