Breaking News

भरधाव वेगातल्या चारचाकीची धडकेत एकाचा मृत्यू


उल्हासनगरच्या १७ सेक्शन येथून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावर रविवारी रात्री हा अपघात झाला.भरधाव वेगात असलेल्या एका चारचाकी वाहनाने समोर आलेल्या दुचाकीला वाचवण्यासाठी रस्त्यावरील डिव्हायडरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघात एकाचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरच्या १७ सेक्शन येथून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावरील रविवारी रात्री हा अपघात झाला.

या अपघातात चारचाकी गाडीतील प्रशांत ठाणगे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान हा अपघात एका दुकानावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. प्रशांत आणि त्याचा मित्र बदलापूरहून रविवारी रात्रीच्या सुमारास कल्याणच्या दिशेने आपल्या कारने येत असताना मुसळधार पाऊस सुरु होता.