विश्वविक्रमी योगसाधना, गिनीज बुकात नोंद
योगगुरू बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत कोटा शहरात योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. आचार्य बालकृष्णन, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यावेळी उपस्थित होत्या. यावेळी तब्बल दीड लाख विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.मोठ्या प्रमाणावर समुहाने योगाची प्रात्यक्षिके करण्याची जगातील पहिलीच वेळ ठरली. त्यामुळे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये कार्यक्रमाची नोंद करण्यात आली.