योग ही जगाला जोडणारी शक्ती : पंतप्रधान
डेहराडून/वृत्तसंस्था : वेगाने बदलणार्या जीवनशैलीत माणसाचे शरीर, मेंदू आणि आत्मा यांना जोडण्याचे काम योग करतो. त्यामुळे माणसाला आंतरिक शांततेची अनुभूती मिळते. जगाला जोडणारी योग ही महत्त्वाची शक्ती असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी डेहराडूनच्या ’फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्युट’मध्ये आयोजित कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यावेळी उपस्थितांसोबत पंतप्रधानांनी योगाची प्रात्यक्षिके केली. ‘योग’ डे सुदृढ आरोग्यासाठी सुरू असलेली जनचळवळ आहे. देहराडूनपासून डुब्लिन आणि जकार्तापासून जोहन्सबर्गपर्यंत आज सर्वत्र योग पाहायला मिळत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी यांनी ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या योग कार्यक्रमांना हजेरी लावली.
योग भारतामध्ये प्राचीन काळापासून प्रचलित आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा आंतरराष्ट्रीय योग दिवसाची कल्पना सप्टेंबर 2014 ला राष्ट्रसंघाच्या आमसभेत मांडली तेव्हा त्याला जागतिक महत्व प्राप्त झाले. त्यानंतर 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून पाळला जातो. योग दिनाचा मसुदा भारताचे णछॠ- मधील कायमस्वरुपी प्रतिनिधी अशोक कुमार यांनी मांडला होता. तेव्हा तो 193 देशांपैकी 177 देशांकडून पास करण्यात आला. हा ठराव आत्तापर्यंतचा सर्वात जास्त बहुमताने पास झालेला ठराव आहे. यामध्ये मोदींची कल्पना अशी आहे, की सॉफ्ट पॉवरचा वापर करुन भारताची नव-प्रतिमा आंतरराष्ट्रीय समुदायापुढे आणणे. यामध्ये प्रतिष्ठा, संवाद, सामूहिक विकास, प्रादेशिक जागतिक सुरक्षा, संस्कृती व सभ्यता या पाच महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.