Breaking News

प्रा. वर्षा काकड सेट परीक्षा उत्तीर्ण

अकोले महाविद्यालयात मराठी व राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापक म्हणून 2015 पासून कार्यरत असलेल्या सौ. वर्षा उदय काकड यांनी विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण होऊन सेट पात्रता प्राप्त केली आहे. परीक्षेत येथील अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित, अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या प्रा. वर्षा उदय काकड यांनी एम.ए.बी.एड्. (मराठी/राज्यशास्त्र) नंतर सहाय्यक प्राध्यापक पात्रता (सेट) परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, सचिव यशवंत आभाळे, प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारीणी सदस्य बाळासाहेब भोर, डॉ. यासीन सय्यद, प्रा. बी. एम. महाले, प्रा. डॉ. संजय ताकटे, प्रा. डॉ. अविनाश झांबरे, भाराती ताकटे, सीमा झांबरे, शोभा पोखरकर, अंगणवाडी सेविका काकड आदींनी अभिनंदन केले आहे.