Breaking News

अनघा ढवळे-चौधरी मुख्याधिकारीपदी निवड


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या मुख्याधिकारी परीक्षेत वडझिरे येथील अनघा नवनाथ ढवळे यांनी मोठे यश संपादन केले असुन त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. वडझिरे, ता. पारनेर येथील पोलीस उपनिरीक्षक (कराड) नवनाथ भिकाजी ढवळे यांच्या अनघा ढवळे या पत्नी आहेत. अनघा ढवळे या सध्यास्थित कल्याण येथे विक्रीकर निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. ठाणे शहरातील पिंपठ्य एज्युकेशन सोसायटीची विद्यार्थीनी आहे. सहावी, बारावीत अनुक्रमे 94, 93 टक्के मार्क मिळवून गुणवत्ता यादीत आल्या होत्या. त्यांनी इंजिनीअरींग अ‍ॅण्ड इलेक्ट्रीक टेलिकम्युनिकेशन पदवी प्रथम श्रेणीत संपदीत केली आहे. अळकुटी ग्रामिण पतसंस्थेचे चेअरमन महेश शिरोळे यांच्या त्या भाची आहे. त्यांच्या या यशाबद्दल रामलिंग पतसंस्थेचे चेअरमन बबन गंधाक्ते माजी सरपंच बाळासाहेब दिघे, वसंत मोरे, महेश शिरोळे, सरपंच शिवाजी औटी, उद्योजक राम एरंडे, माजी जि.प. सदस्य राजाराम एरंडे, प्रविण निघुट, संतोष दिघे, सुनिल करकंडे, गणेश मोरे, बाळासाहेब लंके, शिवाजी झंजाड, गारखिंडी ग्रामस्थ वडझिरे येथील ग्रामस्थ पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. अनघा ढवळे-चौधरी यांना त्यांचे पती नवनाथ ढवळे, आई सुरेखा चौधरी, वडील अनधा चौधरी, दीर पंढरीनाथ ढवळे, गुरुजन वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.