Breaking News

कॅप्टन धनंजय मनकर यांना सैन्यदलात पदोन्नती


लोणी प्रतिनिधी
राहाता तालुक्‍यातील दुर्गापूर येथील धनंजय मनकर यांची नुकतीच भारतीय सैन्य दलामध्ये मेजर पदावर निवड झाली. त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणानंतर बी. ई कॉम्प्युटर ही पदवी संगमनेर येथून घेतली. त्यानंतर त्यांनी देशाच्या सैन्य दलामध्ये भरतीसाठी युनिव्हर्सिटी एंन्ट्री स्कीममधून स्पर्धा परिक्षा दिल्‍या. २०१३ मध्ये त्यांची सर्व प्रथम लेप्टनंट म्हणून निवड झाली. त्यानंतर २०१४ मध्‍ये कॅप्टन आणि आता त्यांची मेजर म्हणून पदोन्नती झाली. 

मनकर हे सध्या मेजर म्हणून ३१ एफएडी युनिट पानागड, वेस्ट बंगाल येथे कर्तव्‍य बजावत आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्‍यांनी शिक्षण पूर्ण केले. ते दुर्गापूर येथील प्रगतीशील शेतकरी शहाजी मनकर यांचे नातू व दत्तात्रय मनकर यांचे सुपूत्र तसेच विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे यांचे स्वीय सहाय्यक शिवाजी जाधव यांचे ते जावई आहेत.

त्‍यांच्‍या या यशाबद्दल विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा शालिनी विखे, चेअरमन डॉ. सुजय विखे, प्रवरा मेडीकल ट्रस्‍टचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी डॉ. राजेंद्र विखे, दुर्गापूर ग्रामस्थांनी मेजर मनकर यांचे अभिनंदन केले.