Breaking News

ग्राहक पंचायतीच्या बैठकीत संघटनेच्या कार्याचा आढावा


सोलापूर - ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुणराव देशपांडे यांनी जिल्ह्याचा धावता दौरा केला. त्यांनी पंढरपूर येथे कार्यक र्त्यांना मार्गदर्शन केले. 
ते म्हणाले, बिंदू माधव जोशी यांनी सुरू केलेल्या ग्राहक पंचायतीच्या चळवळीची व्याप्ती ग्रामीण भागात वाढविण्याची गरज असून पदाधिकार्‍यांनी रचनात्मक कार्याला महत्त्व देत तालुकावार संघटनात्मक बांधणी करण्याचे आवाहन केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष विनोद भरते होते. या बैठकीत अरुण देशपांडे यांनी जिह्यातील कामाचा आढावा घेताना जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात ग्राहक सेवा केंद्रे सुरू करावीत. ग्राहक पंचायतीचे कार्य देशभरात सुरू असून 310 जिल्ह्यात ग्राहक पंचायत कार्यरत आहे. चांगला नागरीक तयार करणे, सजग ग्राहक व कार्यकर्ता बनविणे हे मुख्य काम ग्राहक पंचायतीचे आहे. उपस्थितांचे स्वागत दीपक इरकल यांनी केले. सांगोला ग्राहक पंचायतीच्या वतीने राष्ट्रीय सचिव देशपांडे यांचा तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत लिगाडे यांनी सत्कार केला. बैठकीत भालचंद्र पाठक, नागेश जोशी, जिल्हा संघटक शशिकांत हरिदास, देविदास बाबर, विनय उपाध्ये, दत्ता कुलकर्णी यांनी आपली मते मांडली.