महापौरपद तेलुगू भाषिक महिलेस देण्याची मागणी
सोलापूर - यंदाच्या महापौर निवडीवेळी सव्वा सव्वा वर्ष महापौर पद देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार प्रथम महपौरांचे सव्वा वर्ष संपले आहे. त्यानुसार आता तेलुगू भाषिक श्रीकांचना यन्नम यांना ठरल्याप्रमाणे महापौर पद देण्यात यावे, अशी मागणी तेलुगू युवा सेनेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली. श्रीकांचना यन्नम भाजप पार्टीतून तीन टर्मपासून निवडून येत आहेत. यन्नम यांना सव्वा वर्ष महापौर पद द्यायचे भाजप पार्टीमध्ये ठरले होते. आता मात्र चालढकल केली जात आहे. यातून तेलुगू समाजाचा फक्त निवडणुकीपुरता वापर के ला जात असल्याचे दिसून येत आहे. समाजाशी कसलाही राजकीय डावपेच करू नये. अन्यथा भविष्यात हा समाज जशाच तसे उत्तर देईल, असा इशारा तेलुगू युवा सेनेच्यावतीने यावेळी करण्यात आला.