Breaking News

राज्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात स्टार्टअपचे आयोजन करणार - संभाजी पाटील निलंगेकर



मुंबई : ग्रामीण भागात विविध नव संकल्पना उपलब्ध असून त्यांना योग्य ती संधी निर्माण करून देण्याच्या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यात राज्याच्या धर्तीवर स्टार्ट अप सुरू करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. राज्य कौशल्य विकास व उद्योजकता विभाग आणि महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राबविण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र स्टार्ट अप’ सप्ताह 2018 च्या सांगता समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी एस बँक आणि कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांत सामंजस्य करार करण्यात आला.

मुंबई येथील ताज विवांता हॉटेल येथे ‘महाराष्ट्र स्टार्ट अप’ सप्ताह 2018 दि.25 जून ते 29 जून पर्यंत आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहाच्या सांगता समारंभात 100 स्टार्टअपची सादरीकरणासाठी निवड करण्यात आली होती. यातून प्रत्येक क्षेत्रातील तीन अशा 24 उत्कृष्ट कल्पनांची निवड स्टार्टअप सुरू करण्यासाठी केली असून या कार्यक्रमात निवडलेल्या 24 स्टार्टअप ना १५ लाखापर्यंतच्या कामाचे कार्यादेश समारंभात प्रदान करण्यात आले. यावेळी आज झालेल्या श्री. पाटील निलंगेकर यांच्यासह ज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे सह अध्यक्ष रघुनाथ माशेलकर, एस बँक च्या ग्लोबल हेड श्रीमती नमिता मिश्रा व इतर मान्यवर उपस्थित होते.