अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे - डॉ. श्रीपाल सबनीस
पुणे, दि. 01, ऑगस्ट - अण्णाभाऊंच्या शाहिरी आणि साहित्य निर्मितीने मराठी साहित्य आणि संस्कृती विश्व कायमच प्रभावित केले आहे. निदान मृत्यूपच्छात तरी त्यांच्या साहित्य योगदानाची दखल घेऊन त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली.
यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, अण्णाभाऊंनी तीनशेहून अधिक कथा, 250 हून अधिक गाणी, 60 वगनाट्य आणि सुमारे 33 कादंबरी लिहून महाराष्ट्राला सकस आणि कलात्मक साहित्याचे वैभव दिले. मात्र या बहुआयामी प्रतिभावंत साहित्यिकाची जिवंतपणी अक्षम्य उपेक्षा झाली, ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे. आपल्या या अपराधाचे प्रायश्चित निदान काही प्रमाणात तरी करण्याचा उदारभाव आपण दाखविला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर स्व. अण्णाभाऊ साठे यांचे योगदान महत्तवपूर्ण होते. एस.एम.जोशी, आर्चाय अत्रे, कॉम्रेड डांगे यांच्यासह शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर आदींनी त्यांच्या साहित्य निर्मितीतून संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत मोलाची भुमीका पार पाडली. परंतू हे सर्व साहित्यिक आणि त्यांच्या साहित्यिक योगदानाची योग्य दखल मराठी साहित्य विश्वात घेतली गेली नाही हे खेदाने नमूद करावसे वाटते.