Breaking News

कामातील अनियमिततेमुळे पाथर्डीतील १४ छावणी चालकांविरुद्ध गुन्हे दाखल.


पाथर्डी/श.प्रतिनिधी/- कामातील अनियमिततेचा ठपका ठेवून पाथर्डी तालुक्यातील १४ छावणी चालकांविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात शनिवार,३ फेब्रुवारीच्या रात्री फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार पाथर्डी तहसीलदारांनी पत्राद्वारे हे गुन्हे दाखल करण्यात आले. सन २०१२ ते २०१४ या कालावधीतील पाथर्डी, करंजी, कोरडगाव, मिरी, टाकळीमानुर येथील छावणी चालकांनी छावण्यांमध्ये जनावरांच्या नोंदी, छावणी मध्ये प्राप्त चारा, मिनरल मिक्चर, खाद्य वाटप, शिल्लक साठा, या गोष्टींचा हिशेब न जुळणे आदी बाबींची अनियमितता छावणी चालकांनी केलेली आहे. त्यामुळे कोल्हेश्वरी ग्रामविकास संस्था कोल्हार, शंकर महाराज मजूर सहकारी संस्था, कै. बाबुराव ताठे ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्था मिरी, मळगंगा सार्वजनिक वाचनालय कोपरे, कोल्हार विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी कोल्हार, नवजीवन बहुउद्देशीय संस्था करडवाडी, श्री संत तनपुरे महाराज चारोधाम मंडप ट्रस्ट पंढरपूर ( छावणीचे ठिकाण दगडवाडी), वैजनाथ ग्राम व पाणलोट क्षेत्र विकास संस्था वैजूबाभूळगाव, चितळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चितळी, शिवनेरी सामाजिक सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ पाथर्डी, पारिजात महिला दूध उत्पादक संस्था वसुजळ्गाव, श्री आदिनाथ सेवाभावी व विकास संस्था शेकटे, जय नागेश्वर ग्रामविकास संस्था अकोले, आल्हनवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आल्हनवाडी आदी संस्थांवर दंडात्मक करवाईसुद्धा करण्यात आली.