पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या उत्पन्नात मोठी वाढ, 50 लाखांची ठेव जमा
सोलापूर, दि. 24, जून - पद्मशाली ज्ञाती संस्थेने गत आर्थिक वर्षात काटकसर करून उत्पन्नात मोठी वाढ मिळवली. संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच 50 लाख रुपयांची ठेव बँकेत ठेवल्याची माहिती सरचिटणीस सुरेश फलमारी यांनी दिली. संस्थेची रविवारी (ता. 24) वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. त्याचा ताळेबंद सभेपुढे ठेवण्यात आला. गत आर्थिक वर्षात संस्थेच्या प्रगतीविषयी सांगताना ते म्हणाले, संस्थेच्या मिळकती पडून होत्या. काही मिळकतींच्या भाड्यात वर्षानुवर्षे वाढ नाही. त्यांच्याशी बोलून चालू दराने वाढ सुचवली. त्यानुसार सकारात्मक प्रतिसाद मिळाला. प रिणामी संस्थेच्या मिळकतीत मोठी वाढ झाली. आलेल्या पैशातून घोंगडे वस्ती, साखर पेठ येथील जागांवर बांधकाम करण्याचे नियोजन आहे.मद्दा मंगल कार्यालयाची वास्तू नूतनीकरण के ल्यानंतरही उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले नाहीत. ही बाब हेरून सहकार खात्याच्या लेखापरीक्षण विभागाला वरील मजला देण्याचा निर्णय झाला. त्यातून वार्षिक साडेचार लाख रुपये मिळणार आहेत, असे फलमारी यांनी सांगितले.