विविध विस्तार योजनेंतर्गत वितरकामार्फत अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण
सांगली - महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सन 2018-19 मध्ये विविध विस्तार योजनेंतर्गत सांगली जिल्ह्याकरीता वितरकामार्फत अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरणाचे लक्षांक प्राप्त झाले आहे. शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी केले आहे.
साबळे म्हणाले, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत तूर, मुग व उडीद या पिकाचे जिल्ह्यात 10 वर्षाच्या वरील प्रमाणित बियाणे किंमतीच्या 50 टक्के किंवा 2 हजार 500 रूपये प्रति क्विं टल या प्रमाणे अनुक्रमे 47 क्विंटल, 62 क्विंटल व 31 क्विंटल वाटपाचे तसेच 10 वर्षाच्या आतील बियाणे किंमतीच्या 50 टक्के किंवा 5 हजार रूपये प्रति क्विंटल या प्रमाणे अनुक्रमे वाटपाचे 44 क्विंटल, 85 क्विंटल व 1 क्विंटल लक्षांक आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान भरडधान्य मका विकास कार्यक्रमांतर्गत व मका या पिकाचे संकरीत वाणाचे 10 वर्षाच्या आतील प्रमाणीत बियाणे किं मतीच्या 50 टक्के किंवा 10 हजार रूपये प्रति क्विंटल प्रमाणे 200 क्विंटलचे लक्षांक आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमांतर्गत ज्वारी व बाजरी या पिकाचे संकरीत वाणाचे 10 वर्षाच्या आतील प्रमाणीत बियाणे किंमतीच्या 50 टक्के किंवा 10 हजार रूपये प्रति क्विं टल या प्रमाणे अनुक्रमे 25 क्विंटल, 2 क्विंटल लक्षांक आहे. तसेच सुधारीत वाणाचे ज्वारी व बाजरी या पिकाचे 10 वर्षाच्या आतील प्रमाणीत बियाणे किंमतीच्या 50 टक्के किंवा 3 हजार रूपये प्र ति क्विंटल याप्रमाणे अनुक्रमे 500 क्विंटल व 170 क्विंटल लक्षांक आहे. तसेच सुधारीत वाणाचे ज्वारी व बाजरी या पिकाचे 10 वर्षाच्या वरील प्रमाणीत बियाणे किंमतीच्या 50 टक्के किंवा 1 हजार 500 रूपये प्रति क्विंटल याप्रमाणे अनुक्रमे 250 क्विंटल व 120 क्विंटल लक्षांक आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान गळीतधान्य कार्यक्रमांतर्गत गळीतधान्य या पिकाचे 15 वर्षाच्या आतील सुधारीत वाणाचे प्रमाणित बियाणे 4 हजार रूपये प्रति क्विंटल या प्रमाणे 880 क्विंटल लक्षांक आहे. तरी सर्व शेतकर्यांनी आपल्या नजीकच्या महाबीज वितरकामार्फत अनुदान वजा जाता शेतकरी हिस्सा आदा करून बियाणे खरेदी करावे व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही साबळे यांनी केले आहे.