Breaking News

चिमुकल्यांनी घेतली प्लास्टिक बंदीची प्रतिज्ञा.


आश्वी : प्रतिनिधी : पानोडी येथील ज्ञानविद्या बहुउद्देशिय संस्थेच्या बालपन स्कूलच्या चिमुकल्यांनी प्लास्टिक पिशवी न वापरता ती हद्दपार करत बंदीची प्रतिज्ञा घेतली. शाळेच्या पहिल्या दिवशीच पार पडलेल्या उपक्रमामुळे एका नवा आदर्श व संदेश दिला.

यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी अथवा कागदी पिशवी वापरण्याचे आवाहन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यानी ‘प्लास्टिक कँरिबँग की नही कोई शान, मिटा दो उसका नामो निशान ’, शाळा स्वच्छ व सुंदर करणे, शाळेत प्लास्टिक पिशवी न आणने, ‘ प्लँस्टिक कँरिबँग हटाव, देश बचाव ’ अशा घोषणा दिल्या.

यावेळी शिक्षकांनी प्लास्टिक पिशवीचे तोटे व पर्यावरणाला कशाप्रकारे हानिकारक आहे, याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेच्या प्रमुख सोनाली मुंढे उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.