Breaking News

महावितरणच्या गलथान कारभारामुळे अनेक गावे अंधारात ! लोकनेते निलेश लंके यांनी अधिकार्‍यांना विचारला जाब

तालुक्यात गेली अनेक दिवस अनेक गावे अंधारात आहेत. विज वितरणच्या संबंधीत अधिकार्‍यांना विचारणा केली असता, उडवा उडवीचे उत्तरे ऐैकण्यास मिळत. सामान्य जनतेच्या मुलभुत गरजा पुर्ण होनार का ? असा प्रश्‍न सामान्य नागरीकांना पडला आहे.


निलेश लंके प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बापु शिर्के व सचिव पोटघन मेजर यांनी काल पत्रक काढून, विज सुरळीत न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत आज बर्‍याच गावांचा विज पुरवठा सुरळीत झाला आहे. लोकनेते निलेश लंके यांनी आज वीज वितरणच्या कार्यालयात जावून आढावा घेतला असता, टाकळी ढोकेश्‍वर भागातील बरीचशी गावे अंधारात आहे. त्याची चौकशी संबंधीत अधिकार्‍यांना लंके यांनी फोनवरून केली असता थोडया वेळात विज पुरवठा सुरळीत होईल असे उपअभियंता देवरे यांनी सांगितले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापु शेठ, रामा तराळ, महेश झावरे, सिद्धेश खिलारी व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी आज दिवसभर विज कर्मचार्‍यांच्या बरोबर थांबून बर्‍याच गावचा विजपुरवठा सुरळीत करून घेतला, तर दुसरीकडे लोकनेते निलेश लंके यांनी बराच वेळ कार्यालयात थांबुन खंडीत विजपुरवठ्या संदर्भात विचारणा करत अनेक गावांचा विज पुरवठा सुरळीत केला.