Breaking News

अखेर राऊत पोलिसांच्या जाळ्यात


करमाळा तालुक्यातील पारेवाडी येथील अक्षय राऊत व चंद्रकांत राऊत यांना जामखेड तालुक्यातील अरणगाव येथून रात्री 1 वा कर्जत पोलीसांनी अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जतचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांना गुप्त बातमीदारामार्फत या अरोपींची माहिती मिळाली, त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सहदेव पालवे यांना पथक रवाना केले. पालवे यांच्या पथकाने अरोपीस जेरबंद केले.
यावेळी पालवे याच्यासह हंचे, मरकड यांनी खाजगी वाहनाने व सिव्हील ड्रेसवर जावून ही कारवाई केली.