Breaking News

फुले आंबेडकरी विचारांचा जागर करा

महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांतुन, बहुजन समाजाला जीवनाचा एक आदर्श विचार मिळाला म्हणुन, फुले आंबेडकरी विचाराचा जागर बहुजन समाजाने केलाच पाहिजे असे प्रतिपादन पत्रकार संजय मोरे यांनी केले.

पारनेर तालुक्यातील सावरगाव येथे पारनेर तालुका बलुतेदार संघटना व आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक शैक्षणिक सामाजिक कृती प्रतिष्ठान संगमनेर, पारनेर जुन्नर, सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत केलेल्या मेळावा व पुरस्कार वितरण समारंभात अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन कर्जत विभागीय पोलिस आधिकारी अंकुश ढवळे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष बबनराव पोळ, जिल्हा सचिव अनिल ढवळे, जुन्नर तालुका जय मल्हार संघटनेचे तालुकाध्यक्ष शंकर गोफणे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष शांतीलाल मदने, सिन्नरचे डॉ. चव्हाण, रिपब्लीकन सेनेचे तालुकाध्यक्ष पोपट कसबे, तालुका सचिव अन्सार पटेल, चर्मकार संघटनेचे पारनेर तालुकाध्यक्ष संतोष घनदाट, गुरव संघटनेचे तालुकाध्यक्ष रणधीर शिंदे, नाभिक समाज संघटनेचे बबन सुनसुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मोरे पुढे बोलताना म्हणाले की, बारा बलुतेदार व अठरा आलुतेदार यांच्यामध्ये भविष्यकाळात संघटन होणे आवश्यक आहे, त्यासाठी पारनेर तालुका पुढाकार घेईन, बलुतेदार समाजाच्या विखुरलेपणाचा फायदा राजकिय मंडळी घेतात. समाज न्याय हक्कापासुन वंचित राहतात, समाजाच्या हितासाठी सर्व बहुजन समाजाने एकत्र येण्याचे आवाहन त्यानी केले.
या वेळी गंगाधर गुळवे, अंकुश ढवळे, शांतीलाल मदने, बबन सुनसुळे, शंकर गोफणे यांचीही भाषणे झाली. यावेळी आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श पत्रकारिता पुरस्कार संजय मोरे, समाजभुषण पुरस्कार पारनेर तालुका बलुतेदार संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिरतार यांना तर उत्कृष्ट खेळाडू म्हणुन दिल्ली येथे 2017 येथे पार पडलेल्या मेराथॉन स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविणारा देविदास यरमल (संगमनेर) यांना प्रदान करण्यात आला, शाल श्रीफळ सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.