Breaking News

खिरविरेत साहीत्य चोरीचे सत्र सुरूच पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष.

पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी-

अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या खिरविरे गावात जिल्हा परिषदेच्या शाळा, आश्रमशाळा, विद्यालय, पवनऊर्जा प्रकल्प कार्यरत आहे. तसेच मोठी बाजारपेठ देखील उपलब्ध असल्याने येथे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. खिरविरे गावचा शैक्षणिक दर्जा उंचावत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी संगणक ज्ञानदेखील मिळत आहे. परंतु याच ठिकाणी काही ऐतखाऊ मात्र दररोजची रोजीरोटी भागवण्यासाठी मेहनत न करता या शैक्षणिक साहित्यांवर डल्ला मारून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अडथळा निर्माण करू पाहतात.
खिरविरे (ता. अकोले) येथील जि. प.च्या प्राथमिक केंद्र शाळेचे कुलुप तोडून चोरट्यांनी पोषण आहाराची गॅस टाकी तसेच कम्प्युटर सेट चोरुन नेला. तसेच शालेय कागदपत्रांची उचकापाचक करून पोबारा केला. त्याचप्रमाणे चंदगीरवाडी ग्रामपंचायतीतील कंप्युटर सेट, साउंड बॉक्स, लॅपटॉप चोरून नेला. तसेच इदेवाडी येथील प्राथमिक शाळेचे देखील डिव्हाइस ई लर्निग कमेरा चोरट्यांनी चोरून नेला आहे. अशा प्रकारचे चोरीचे सत्र या परिसरात नेहमीच पाहवयास मिळत आहे. या प्रकारच्या चोर्‍या याआधी देखील बहुतेक वेळा घडल्या आहेत. प्रत्येक वेळी पोलीस केस करूनही पोलीसांनी याकडे गाभिर्याने लक्ष दिले जात नाही. म्हनुनच पोलीस प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. म्हणूनच परिसरातील चोरीचे सत्र थांबावे, तसेच पोलीस प्रशासनाने किमान अठवड्यातुन एकदा गस्त घालावी, अवैध व्यवसाय बंद करावेत तसेच चोरांना तात्काळ पकडून त्यांचेवर कारवाई करावी अशी सरपंच गीताबाई रावते, उपसरपंच सुनंदा आवारी, पोलीस पाटील हिरामण बेणके, माजी सरपंच गणपत डगळे, माजी उपसरपंच देवराम हाळ्कुंडे, सुभाष बेणके, पंढरीनाथ बेणके, कांताबाई बेणके, प्रकाश पराड, भिमराव बेणके, विजय आवारी, दादा आवारी, दत्तु हाळकुंडे, कैलास पराड, मुख्याध्यापक भांगरे, ग्रामसेवक गोडे तसेच समस्थ ग्रामस्थांनी मागणी केली आहे.