Breaking News

सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या पाठपुराव्याला यश


कोपरगाव शहर प्रतिनिधी : नागरी व पगारदार सहकारी पतसंस्थासाठी सामोपचार परतफेड योजनेस मुदतवाढ देण्याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जाहीर केले आहे. यामुळे नागरी व पगारदार सहकारी पतसंथांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. 

सदर योजना मंजूर करून घेण्यासाठी अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाचे अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, उपाध्यक्ष वसंत लोढा यांनी पाठपुरावा केला होता. 

या निर्णयानुसार दि. ३१ मार्च २०१६ ची अनुत्पादक कर्ज धरण्याची कट ऑफ डेट निश्चित केली आहे. त्याचप्रमाणे या कर्जाच्या वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली दाखला प्राप्त झाला आहे, अशाच कर्ज खात्यांना या योजनेचा लाभ देय राहणार आहे.

या योजनेनुसार तडजोडीचा व्याजदर १२ टक्के करण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु कर्जदार तडजोडीची रक्कम एक रक्कमी भरत असल्यास ८ टक्के दरानेदेखील तडजोड करता येईल. या कर्ज योजनेंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२० ही राहील. या योजनेचा थकबाकीदारांनी व पतसंस्थानी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. राज्याचे सहकार पणन वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी पतसंस्थांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात सहकार आयुक्त यांना सूचित केले आहे. परंतु अद्यापही आयुक्तांनी या पत्राची कार्यवाही न केल्याने याबाबतदेखील दि. ५ जून रोजी मंत्रालयात सहकार सचिव यांची तातडीने कार्यवाही करण्याची सूचना सहकार आयुक्त कार्यालयास केली आहे.