Breaking News

शेतकरी संपामुळे नाशिक जिल्ह्यात शेतमालाची आवक घसरली

नाशिक, दि. 03, जून - राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता मंचने शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून पुकारलेल्या संपामुळे नाशिकसह जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजारसमितीत विक्रीसाठी येणा-या शेतमालाची आवक दुस-या दिवशीही फारच कमी होती. 

या संपाचा परिणाम म्हणून शनिवारी दुपारी बाजारसमितीत शुक्रवारपेक्षा 15 ते 20 टक्के मालाची आवक वाढली होती.कमी आवक असल्याने भाजीपाला दर तेजी होते. तर याचा मोठा फटका मुंबई आणि उपनगर भागाला मोठ्या प्रमणात जाणवणार आहे.
संप आणि मालवाहतूक बंद परिणाम जाणवला आहे. नाशिक बाजारसमितीतून मुंबई व उपनगरात दैनंदिन 35 ते 40 वाहने किंबहुना जास्त प्रमाणत भाजीपाला नियमित स्वरूपात नेला जातो. तर अनेक शेतकरी स्वतः माल घेवून ग्राहकांना विकत असतात. मात्र दोन दिवसांपासून मुंबईकडे पाठवत पालेभाज्या मालाची 50 टक्के घटली आहे. त्यामुळे मुंबईकरांना वाढत्या किंमतीचा फटका सहन करवा लागणार आहे.
शेतमाल कमी प्रमाणात विक्रीसाठी येत असल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत.दरम्यान शनिवारी बाजार समितीतील व्यवहार बंद असल्याची अफवा पसरल्याने दिंडोरी तालुक्यातून शेतमालाची विशेष आवक झाली नाही. तर अनेक ठिकाणी शेतकरी वर्गाने दुध विक्रीस नेले नाही. त्यामुळे दुधाच्या किंमती वाढणार आहेत.