Breaking News

शेवटचा श्‍वास असेपर्यंत जनतेची सेवा करेल : ना. पंकजाताई मुंडे

बीड : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त आज गोपीनाथ गडावर विविध सामाजिक उपक्रम तसेच कर्तृत्ववान व्यकींचा गौरव करण्यात आला आजचा दिवस सामा जिक उत्थान दिन म्हणूनही साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला गोपीनाथगडावर प्रचंड गर्दी जमली होती, यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतांना, ना. पंकजा मुंडे म्हणाल्या की, आजचा दिवस साजरा करावा असे आपल्याला कधीही वाटले नाही, मुंडे साहेबांनी आपल्याला कधीही रडायला नाही, तर सतत लढायला शिकवले. व्यासपीठावरील सर्व दिग्गज मान्यवर मंडळींमुळे मला आज मी खूप ताकदवान असल्याचे सतत वाटतं आहे. तीन जुन उजाडला की माझे मन सुन्न होते. तो दिवस मला आजही आठवतो आणि माझे मन गंभीर होते. नियतीनेच मुंडे साहेबांवर वार केले अन्यथा ती ताकद कोणातही नव्हती. आज गोपीनाथगडावर उभे असलेले मुंडे साहेबांचे स्मारक हे आम्हा सर्वांसाठी ऊर्जेचा स्रोत असून, हे स्मारक आम्हाला सतत प्रेरणा देते. 

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती खा. उदयनराजे भोसले, छत्रपती खा.संभाजीराजे भोसले, जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे, पशूसंवर्धन मंत्री महादेव जानक र,राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मंत्री विजय देशमुख, दिलीप कांबळे, पाशा पटेल, आ.सुरजितसिंह ठाकूर, आ.भीमराव धोंडे, आ.आर टी देशमुख, आ.मोनिका राजळे, आ. शिवाजीराव कर्डिले, आ.बाबुराव पाचर्णे, आ.तानाजी मुटकुळे, आ. सुधाकर भालेराव, आ. संगीता ठोंबरे, आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंडे साहेबांनी आयुष्यभर उपेक्षितांसाठी लढा दिला. पक्ष व पक्षातित सलोखा आणि सर्व समाज घटकांशी एकरूप होऊन गेलेला लोकोत्तर लोकनेता अशी राजकारणातील अपवादात्मक गुणविशेषता असणारे व्यक्तीमत्व म्हणजे गोपीनाथराव मुंडे हे आहेत. वंचित -पिडीतांचा खराखुरा स्वाभिमान व संघर्ष बनलेल्या गोपीनाथ मुंडे या नावाशिवाय महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास पूर्ण होऊ शकत नाही असे फडणवीस म्हणाले. भाजपातील माझ्यासह असंख्य कार्यकर्त्यांची जडणघडण गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यांच्या विचारानेच राज्यात सरकार वाटचाल करीत आहे. माझ्या राजकीय वाटचालीत सभागृहात व सभागृहाबाहेर खंबीरपणे उभे राहणारे नेते गोपीनाथ मुंडे हे होते. स्वहिंमत, प्रचंड आत्मविश्‍वास, आक्रमक व तितकेच प्रेमळ असे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे पैलू आहेत. वंचितांचे खर्या अर्थाने नेते, त्यांचा स्वाभिमान असणारा असे हे नेतृत्व पुन्हा होणे नाही. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना त्यांनी संघटीत गुन्हेगारी नेस्तनाबूत केली. राजकारणातील गुन्हेगारीवर आक्रमकपणे प्रहार केला. एवढेच नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्राची मक्तेदारी असलेल्या सहकार क्षेत्रात ही मुंडे साहेबांनी स्वतःची ओळख निर्माण केली. सहकारात काम करताना ते साखर सम्राट झाले नाहीत तर ऊसतोड मजूरांचे नेते म्हणूनच वावरले ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या सेवेचा आणि संघर्षाचा वारसा त्यांच्या कन्या ना.पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे या अतिशय समर्थपणे चालवित असुन त्यांनी ही राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुंडे साहेबांचे विचार समोर ठेवूनच सरकार काम करत असल्याचे ते म्हणाले.