Breaking News

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडेंच्या अध्यक्षतेखाली दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राची वार्षिक बैठक संपन्न


मुंबई : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राची बैठक आज सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली रविंद्र नाट्यमंदिर येथे झाली. या बैठकीत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा छत्तीसगड,आंध्रप्रदेश या राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत विविध राज्यातील कला तसेच तेथील संस्कृती याबाबत आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र, मध्य प्रदेश,आंध्र प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड या पाच राज्यांमधील कला संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या सांस्कृतिक वर्षासाठी विविध लोककला दर्शन, आदिवासी नृत्य महोत्सव, नाट्य महोत्सव, युवा संगीत महोत्सव आदी कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. या प्रसंगी केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवाडकर यांनी या वार्षिक कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.