अमृतवाहिनी पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश सुविधा केंद्र सुरु
संगमनेर प्रतिनिधी
येथील अमृतवाहिनीमध्ये सन २०१८-१९ च्या प्रथम वर्ष पॉलिटेक्निक प्रवेशासाठी दि. २१ ते दि. २५ पर्यंत व्दित्तीय वर्ष ऑनलाईन प्रवेश सुविधा केंद्र सुरु राहणार आहे, अशी माहिती प्राचार्य प्रा. व्ही. बी. धुमाळ यांनी दिली.
ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य तत्रंशिक्षणालयाने यावर्षीदेखील पॉलिटेक्निकमधील प्रक्रियेसाठी अमृतवाहिनीची निवड केली आहे. माजी शिक्षणमंत्री आ. बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील अनेक वर्षांपासून अमृतवाहिनीत अभियांत्रिकी, एमबीएम व तंत्रनिकेतन, फार्मसी, डी. फार्मसी या अभ्यासक्रमांचे प्रवेश प्रक्रिया केंद्र म्हणून मान्यता आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्यावतीने करण्यात आले आहे.