Breaking News

महापालिका आयुक्तांची मासिक आढावा बैठक संपन्न

मुंबई, दि. 03, जून - ’महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनात महापालिका अधिका-यांची मासिक आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती. ही बैठक महापालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त पश्‍चिम उपनगरे श्रीमती आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.


आजच्या बैठकीदरम्यान चर्चिले गेलेले प्रमुख मुद्दे व संबंधित आदेश याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहेत :
परिमंडळीय उपायुक्तांचे सादरीकरण
महापालिका क्षेत्रातील सर्व 7 परिमंडळांच्या उपायुक्तांनी (नेपरश्र ऊचउ) आपापल्या कार्यक्षेत्रातील पावसाळापूर्व तयारीबाबत सविस्तर संगणकीय सादरीकरण केले.
या सादरीकरणामध्ये परिमंडळीय उपायुक्तांनी त्यांच्या अखत्यारितील विभागांमध्ये पावसाळ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेली पूर्वतयारी, प्रतिबंधात्मक उपाययोजना इत्यादींची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने परिमंडळातील रस्ते, चर खोदण्याची व भरण्याची कामे, घनकचरा व्यवस्थापन, नालेसफाई, छोट्या गटारी, लॅटरल्स, आऊटलेट इत्यादीची साफसफाई व पावसाळापूर्व तयारी विषयीची कामे यांचा आढावा आजच्या बैठकीदरम्यान घेण्यात आला. आरोग्य, कीटक नियंत्रण (तशलीेीं उेपीीेंश्र), दरड कोसळण्याची ठिकाणे, वृक्ष छाटणी, आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना, शाळा - दवाखाने - स्मशानभूमी इत्यादी विषयक कामे यांचाही आढावा आजच्या बैठकीदरम्यान घेण्यात आला. वरीलनुसार पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने विविधस्तरीय कामे महापालिकेद्वारे करण्यात येत आहेत. यापैकी बहुतांश कामे आता पूर्ण होत आली आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. या सर्व कामांबाबत तसेच प्रतिबंधात्क उपाययोजनांबाबत पावसाळ्यादरम्यान नियमितपणे आढावा घ्यावा व आवश्यक तेथे स्वतः भेट द्यावी, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकी दरम्यान दिले.
खाद्यपदार्थ उघड्यावर शिजविणारे वा उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री करणारे, अनधिकृत विक्रेते, अनधिकृतपणे बर्फ वा बर्फ मिश्रित पदार्थ विकणारे, निकृष्ठ दर्जाचा बर्फ विकणारे, इत्यादींमुळे नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असे विक्रेते आढळून आल्यास त्यांच्यावर अधिक प्रभावीपणे कारवाई करावी, असे निर्देश आजच्या बैठकीदरम्यान देण्यात आले.
उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांना रविवार 3 जून रोजी कर्तव्यावर राहण्याचे आदेश
महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी रस्त्यांची व पदपथांची कामे सुरु आहेत. तसेच काही ठिकाणी चर खोदण्याची वा भरण्याची कामे सुरु आहेत. या कामांच्या अनुषंगाने ज्या - ज्या ठिकाणी कामे झाली आहेत; त्या - त्या ठिकाणचे खडी, डांबर, बॅरिकेड्स इत्यादी साहित्य पडलेले असू शकते. असे साहित्य तात्काळ योग्य ठिकाणी हलविण्याचे निर्देश दिले आहेत. ही कामे येत्या सोमवारपर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. वरील अनुषंगाने रविवार 3 जून रोजी सर्व परिमंडळीय उपायुक्तांनी व सहाय्यक आयुक्तांनी रविवारची सुट्टी न घेता, आपापल्या क ार्यक्षेत्रात कर्तव्यावर रहावे. या दरम्यान त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रांचा पाहणी दौरा करावा व वरील तपशिलानुसार संबंधित साहित्य आढळून आल्यास ते तात्काळ हलविण्याची कार्यवाही करवून घ्यावी. वरीलनुसार रविवार 3 जून रोजी पाहणी दौ-यादरम्यान पाहणी करतानाची स्वतःची काही छायाचित्रे अतिरिक्त महापालिका आयुक्त यांना भ्रमणध्वनीद्वारे पाठवावीत. याबाबत मंगळवार 5 जून रोजी महापालिकेच्या 24 विभागांपैकी काही विभागांमध्ये महापालिका आयुक्त हे स्वतः अचानक पाहणी दौरा (र्डीीिीळीश तळीळीं) करतील.
मॅनहोलवरील जाळ्यांबाबत
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रेल्वे स्टेशन जवळील परिसर, मंडई, चित्रपट / नाट्य गृहे इत्यादी सर्व वर्दळीची ठिकाणे आणि पाणी साचण्याची संभाव्यता असणारी ठिकाणे इत्यादी ठिकाणांपैकी ज्या ठिकाणी मॅनहोलच्या झाकणांखाली जाळ्या लावण्याचे ठरले होते, त्या ठिकाणी जाळ्या बसविण्यात आल्याची खात्री करवून घेण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले होते. वरील तपशीलानुसार मॅनहोलच्या जाळ्या या केवळ शहर भागात नाही; तर पूर्व व पश्‍चिम उपनगरांमध्ये देखील आवश्यकतेनुसार व गरजेनुरुप बसवायचे आदेश यापूर्वीच देण्यात आले होते. परिमंडळीय उपायुक्तांनी व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांनी पर्जन्यजलवाहिन्या खात्याच्या मदतीने जाळ्या बसविण्याची कार्यवाही करवून घ्यावी. त्याचबरोबर याविषयीचा प्राधान्यक्रम हा परिमंडळीय उपायुक्तांनी निश्‍चित क रावा, असेही आदेश यापूर्वी देण्यात आले होते. याबाबतची कार्यवाही झाली असल्याची खातरजमा पुन्हा एकदा करुन घ्यावी, असे आदेश परिमंडळीय उपायुक्तांना व संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले.
चौपाट्यांवरील सुरक्षितता
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील चौपाट्यांवर येत्या पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आवश्यक ती विविधस्तरीय सुरक्षितता घेण्याचे व संबंधित उपाययोजना अंमलात आणण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. याच अनुषंगाने जीवरक्षक उपाययोजनांचा भाग म्हणून महापालिका क्षेत्रातील सर्व चौपाट्यांवर ’हुटर’ व ध्वनीक्षेपण यंत्रणा (र्झीलश्रळल -ववीशीी डूीींशा) बसविण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असे आदेश संबंधित विभागांना आजच्या बैठकीदरम्यान देण्यात आले.