Breaking News

पहिल्यांदाच सफाई कामगारांना ’ऑफिसर ऑफ द मंथ’

मुंबई, दि. 03, जून - ’स्वच्छता सर्वेक्षण 2018’ या संपूर्ण देशभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणांतर्गत देशातील राज्यांच्या राजधान्यांच्या गटात (डींरींश उरळिींरश्र उरींशसेीू) बृहन्मुंबई महापालिके ला देशभरात प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. या गौरवात महापालिकेचे सफाई कामगार, कर्मचारी आणि अधिकारी यांनी दिवस रात्र एक करुन केलेल्या प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. ही बाब लक्षात घेऊन ’जून 2018’ साठी घनकचरा व्यवस्थापन खात्यातील दोन सफाई कामगार, दोन कर्मचारी व एक अधिकारी यांचा प्रातिनिधीक स्वरुपात ’ऑफिसर ऑफ द मंथ’ या बहुमानाने महापालिका आयुक्तांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला आहे. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगार अरुणा भगवान पुराडकर, सफाई कामगार संतोष लक्ष्मण वनगुले, क निष्ठ अवेक्षक लीना खोडीदास चारनीया, सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक तानाजी लक्ष्मण घाग आणि सहाय्यक अभियंता अजय रामभाऊ पाटणे यांचा समावेश आहे.
या सत्कार प्रसंगी अतिरिक्त आयुक्त (पश्‍चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत वैशिष्ट्यपूर्ण व उल्लेखनीय काम करणा-या कर्तव्यतत्पर कर्मचा-यांना ’ऑफिसर ऑफ द मंथ’ या बहुमानाने गौरविण्याची पद्धत डिसेंबर 2015 पासून महापालिकेत सुरु करण्यात आली आहे. या श्रृंखले अंतर्गत आतापर्यंत फक्त अधिका-यांचाच ’ऑफीसर ऑफ द मंथ’ म्हणून महापालिका आयुक्तांच्या हस्ते सत्कार करुन गौरव करण्यात आला आहे. तथापि, यावेळी प्रथमच अधिकारी व कर्मचा-यांसमवेत महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामागरांचाही प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला आहे.
’स्वच्छ भारत अभियान’ महापालिका क्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन खात्यातील अनेक कर्मचारी दिवस रात्र मेहनत घेत आहेत. ’गुड मॉर्निंग’ पथकाच्या समवेत पहाटे 4.00 वाजेपासून अनेक अधिकारी देखील स्वयंस्फूर्तपणे जनजागृतीचे काम करीत आहेत. कुठे पथनाट्यांचे आयोजन केले जात आहे, तर कुठे वस्तीसभा घेऊन जाणीव-जागृती साधली जात आहे. तसेच स्वच्छताविषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी अव्याहतपणे सुरु राहणारा एक विशेष कक्ष देखील सुरु आहे. घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कर्मचा-यांनी संगठीतपणे केलेल्या या विविध प्रयत्नांची दखल घेत केंद्रशासनाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला देशातील राज्याच्या राजधान्यांमध्ये सर्वात स्वच्छ राजधानी म्हणून बृहन्मुंबई महापालिकेला नुकतेच गौरविले आहे. या राष्ट ्रीय स्तरावरील गौरवाचे औचित्य लक्षात घेत, या खात्यातील कामगार, कर्मचारी व अधिकारी यांचा प्रातिनिधीक स्वरुपात ’जून - 2018’ या महिन्यासाठी ’ऑफिसर ऑफ द मंथ’ या बहुमानाने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.