Breaking News

जबरी चोरीतील चौघांना अटक


सोलापूर - पिग्मीचे पैसे जमा करण्यासाठी जाताना चौघा तरुणांनी डोळ्यात चटणी पूड टाकून पन्नास हजार रुपये रोख व पंधरा हजार किमतीचे दागिने असे एकूण 65 हजार रुपये काढून घेण्यात आल्याची तक्रार पालकेप्पा शहापुरे यांनी एमआयडीसी पोलिसात काल दिली होती. आज चौघांना अटक झाली आहे. ही घटना अक्कलकोट रस्त्याजवळ घडली होती. कल्लप्पा कांबळे, प्रवीण कजरापुरे, सूरज धोत्रे, प्रभाकर बाके यांना अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. सरकारतर्फे अ‍ॅड कुलकर्णी, आरोपीतर्फे सचिन कोळी, आजमोद्दीन शेख या वकिलांनी काम पाहिले.