Breaking News

आर्थिक लुबाडणुक करणा-या एजंटावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी


पुणे - जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यांच्याकडून शाखेच्या विद्यार्थ्यांना दोनच दिवसात जातीचे, उत्पन्नाचे दाखले द्यावेत. तहसिल कार्यालय आणि नागरी सुविधा केंद्रातील आर्थिक लुबाडणुक करणा-या एजंटावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी ह्युमन राईटस असोसिशएन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय निरिक्षक रामराव नवघन यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.
निवेदनांत म्हटले आहे की, पालक व विद्यार्थ्यांची तहसिल कार्यालयातील व नागरी सुविधा केंद्रातील एजंटाकडून होणारी पिळवणुक थांबविण्यात यावी. शाळा महाविद्यालयामध्ये हे सर्व कागदपत्रे असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. शाळा महाविद्यालयात देखील पालक व विद्यार्थ्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली जातात व त्यांची पळापळ केली जाते. प्रवेश घेण्यासाठी एखादे तरी प्रमाणपत्र कमी असले तरी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला जात नाही.