Breaking News

जप्त केलेली वाळूची तीन वाहने पळवली


सोलापूर - मंगळवेढा तहसील कार्यालयाच्या आवारात तहसीलदार अप्पासाहेब समिंदर यांनी ओव्हरलोड वाळू वाहतूक करणार्‍या गाड्या पकडून लावल्या होत्या. दरम्यान, 32 लाख 20 हजारांचे तीन ट्रक मुद्देमालासह चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. भीमा नदी पात्रातून सांगलीकडे ओव्हरलोड वाळू घेऊन जाणारी वाहने चार दिवसांपूर्वी तहसीलदार समिंदर यांनी पकडली होती. त्या नवीन तहसील कार्यालयाच्या मैदानात दंडात्मक कारवाईसाठी आणून लावल्या होत्या. तीन ट्रक वाळूसह चोरून नेल्याची फिर्याद नायब तहसीलदार संतोष आदमुलवाड यांनी दिली आहे. तपास पोलिस निरीक्षक सचिन पारधी करत आहेत. दरम्यान, प्रत्येकवेळी वाहने पोलिस स्टेशन आवारात लावली जात असताना याळेस येथे वाहने का लावली? तहसील कार्यालय आवारात कुठलीही सुरक्षितता नसताना कोणाच्या जबाबदारीवर ही वाहने लावल्याचा सवाल विचारला जात आहे. या घटनेला सर्वस्वी तहसीलदार जबाबदार असल्याचा सूर उमटत असून, जिल्हा धिकार्‍यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.