फुलेंना आदर्श मानतो म्हणून फुले पगडी वापरावी हाच हेतू - शरद पवार
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात ’फुले पगडी’च वापरावी अशी गोड ताकीद दिली होती. पवारांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात पगडी राजकारणाला सुरवात झाली होती. ज्या फुलेंना आदर्श मानतो त्या महात्मा फुलेंची पगडी वापरावी हाच त्यामागे हेतु होता. असे खुलासा शरद पवार यांनी फुले पगडी मागच्या वक्तव्याचा एका कार्यक्रमात आज पुण्यात के ला. मध्यंतरी मी पगडी बाबत केेलेेल्या विधानाची देशभर चर्चा होत आहे आणि अनेक मंडळी दुखावली गेली. परंतू त्या वक्तव्यामागे माझा दुसरा काही हेतू नव्हता. कुणाबाबत वैयक्तिक किंवा कु ठल्या समूहाबाबत ते वक्तव्य नव्हते. मी येथे वाढलो, शिकलो आहे त्यामुळे मला पुण्याचा अभिमान आहे. मुलींनी शिक्षण घ्यावे हा फुलेंचा दृष्टिकोन होता. येथील न्यु इंग्लिश स्कुलमध्ये मुलींना 80 वर्षांनी का होईना प्रवेश मिळतो ही चांगली बाब आहे. याचा अर्थ पुणे बदलतेय, असेही पवार म्हणाले.
