Breaking News

नगरसेविका सुजाता पालांडे यांचा जामीन अर्ज फेटाळला


पुणे - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका सुजाता पालांडे यांच्याविरोधात टपरी धारकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रक रणात जामीनासाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे पालांडे यांच्या अडचणींत वाढ झाली असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी येथील एका टपरीधारकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या व्यवसायिकाच्या ’सुसाईड नोट’मध्ये पालांडे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार पालांडे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.