महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन
मुंबई - महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात रोजगार हमी व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड, अवर सचिव महेश व्हावळ, कक्ष अधिकारी श्री. सदाफुले तसेच मंत्री महोदयांचे स्वीय सहाय्यक किशोर माळी आदी उपस्थित होते.
