Breaking News

स्पर्धा परीक्षेत यश मिळवणारे विद्यार्थी तालुक्याचे भुषण - आ. राजळे

शेवगाव / प्रतिनिधी :- ग्रामीण भागातील होतकरु अभ्यासु विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शेवगाव पाथर्डी तालुक्यात अभ्यासिका सुरु करण्यात आली असुन लवकरच पालकमंत्र्याच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात येणार असून ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत मिळविलेले यश ही तालुक्यासाठी भुषणावह बाब असल्याचे प्रतिपादन आ. मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केले. आव्हाणे बु. ता शेवगाव येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झालेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभाप्रसंगी राजळे बोलत होत्या.

यावेळी सोमेश्वर गवळी महाराज, निलेश महाराज वाणी, भाजपा तालुकाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, उमेश भालसिंग, गणेश कराड, आनंता ऊकिडे, महादेव पाटेकर, सोमनाथ कळमकर, अकाश साबळे आदी उपस्थित होते. राजळे पुढे म्हणाल्या की शेवगाव पाथर्डी तालुका सर्वसामान्य शेतमजुर ऊसतोड कामगारांचा आसुन आज प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती प्रशासकीय सेवेत आसावा हि ईच्छा पालक वर्गाची आसल्याने भविष्यात तरुण पिढी उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील असल्याने ही आपल्या गावासाठी तालुका व जिल्ह्यासाठी गौरवशाली बाब आहे. प्रशासकीय सेवेत रुजू झालेल्या तरुणानी आपल्या गावातील सर्व सामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे . यावेळी नुकतीच पोलीस उपनिरीक्षक निवड झालेले रामेश्वर ठाणगे, शरद पवार, आतुल मुरदारे , शरद पाठक , भारत भिसे , सचिन पाटेकर आदींचा तसेच सेवानिवृत्त एस .टी. चालक वाहक यांचा आ. राजळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामभाऊ कोळगे, रामदास दिवटे, बाबासाहेब चोथे, नवनाथ तागड, संजय नांगरे, माऊली भुसारी, रामदास डोंगरे, जगन्नाथ कळमकर, संभाजी डुरे, सतिष भुसारी, असाराम झाडे आदींनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाजपा किसान आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष कचरू चोथे यांनी केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.