Breaking News

युतीसाठी आमची तयारी : मुख्यमंत्री

भाजपला पालघरमध्ये मोठा विजय मिळाला, याचा आम्हाला आनंद आहे, पण ही निवडणूक क्लेशदायक झाली. आमच्या मित्र पक्षाने आमच्याच नेत्याचा मुलाला निवडणुकीत उभे केले. या निवडणुकीत कडवट पणा आला. आमच्याकडून आता हा विषय संपला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच युतीसाठी आमची तयारी आहे. आम्ही क धीही मागे नाही. आता शिवसेनेनेही युतीसाठी पुढे यायला हवे, असे मुख्यमंत्र्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. पालघर, भंडारा-गोंदिया पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. पालघरमध्ये भाजपचे उमेदवार राजेंद्र गावीत विजयी झाले. त्या पार्श्‍वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.