विवाहित महिला मुलांसह बेपत्ता
शिर्डी / प्रतिनिधी
शिर्डीलगत असलेल्या निमगाव-कोऱ्हाळे गावातील देशमुख चारीवर राहणारी महिला दोन मुले आणि एक मुलगी घेऊन घरातून निघून गेली. याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात खबर देण्यात आल्यामुळे निमगाव-कोऱ्हाळे परिसरात खळबळ उडाली.
नंदा विजय त्रिभुवन {वय ५० } असे या महिलेचे नाव आहे. ही महिला शुक्रवारी {दि. २२} सकाळी ९ वाजेच्या सुमारास लहान मुले घेऊन बाहेर गेली. ती परत आलीच नाही. तिचा दिवसभर शोधाशोध घेऊन ती न सापडली नाही. या महिलेची सासू नंदा त्रिभुवन हिने शिर्डी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सून व नातू बेपत्ता झाल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी मिसिंगचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, या महिलेचा पती काही दिवसांपूर्वी देशमुख चारीवर झालेल्या एका गंभीर गुन्ह्यात कारागृहात आहे. त्यातच ही महिला या मुलांना घेऊन कुठे गेली असेल, याविषयी वेगवेगळे तर्क वितर्क लढविले जात आहे. या प्रकरणाचा तपास पो. नि. अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी रावसाहेब शिंदे व बर्डे हे करीत आहेत.