Breaking News

डॉ. कोपटे यांना पी एच डी प्रदान


कोपरगाव शहर प्रतिनिधी : 

येथील डाॅ. योगिता कोपटे यांनी ‘सोन्याच्या आयातीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम’ या विषयावर प्रबंध सादर केला. या प्रबंधास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतीच पी एच डी प्रदान केली.

दरम्यान, वित्तमंत्री अरूण जेटली यांच्या कार्यालयातील केंद्रीय वित्त सहायक संचालक डाॅ. राजकुमार यांच्याशी डॉ. कोपटे यांनी चर्चा केली. त्यांनी सादर केलेल्या सूचनांबददल केंद्रशासनाने त्यांचे आभार मानले. सल्लागार समितीवर काम करण्याबाबतही त्यांच्याकडून विचारणा झाली.

डाॅ. योगिता अरूण कोपटे यांनी अतिशय कष्टातून पी एच डी शिक्षण पूर्ण केले आहे. एम. काॅम. अर्थशास्त्र पदवीधर असलेल्या डाॅ. कोपटे यांनी ६ वर्षे अभ्यास केला. दरम्यान, ग्रामीण भागात राहून डाॅ. योगिता कोपटे यांनी मिळविलेले यश स्पृहनीय असून या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.