Breaking News

माणुसकीचा प्रवास 'विचारांकडून आचरणाकडे' विचारमंथन शिबिर उत्साहात


संगमनेर/प्रतिनिधी
प्रवास माणुसकीचा विचारांकडून आचरणाकडे या दृष्टीकोणातून वाटचाल करत असताना हीच आमुची प्रार्थना आणि अन् हेच आमुचे मागणे आहे. माणसाने माणसासाठी माणसासम वागणे, असे प्रतिपादन अकोले येथील माजी सभापती अंजना बोंबले यांनी केले.

येथील सारथी फाउंडेशन, संगमनेर व राष्ट्रीय सेवा योजना, संगमनेर महाविद्यालय, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील रविंद्रनाथ टागोर आश्रमात चार दिवसाचे राज्यस्तरीय 'विचारमंथन' हे निवासी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. शिबिराचे उदघाटन प्राचार्य डॉ. के. के. देशमुख आणि माजी सभापती बोंबले यांच्या हस्ते झाले. प्रारंभी सारथी फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय बोंबले यांनी प्रास्ताविक केले.

स्वामिराज भिसे, शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, डॉ. संजयकुमार दळवी, सुरेंद्रनाथ गुजराथी, प्रसिध्द कवी कैलास वाघमारे यांच्या व्याख्यानांचे व विविध चर्चासत्रे यांचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात योग व प्राणायम यांनी करुन सहभागी स्वयंसेवकांत उत्साह व आरोग्यविषयी जागृती निर्माण करण्याच्या प्रयत्न केला.