Breaking News

निवडणुकीच्या फंडासाठीच प्लास्टिक बंदीचा फार्स

राज्यातील प्लास्टिक बंदी हा सगळा फार्स आहे. सगळ्या प्लास्टिक व्यापार्‍यांकडून निवडणुकीच्या फंडाची मागणी केली गेली, अशी मला माहिती मिळत आहे. या शब्दांमध्ये प्लास्टिक बंदीवरुन राज ठाकरेंनी रामदास कदम यांच्यावर शरसंधान साधले. हे सगळे नोटाबंदी सारखे झाले आहे. सरकारने आधी गोष्टी पुरवल्या पाहिजे मग प्लास्टिक बंदीचा निर्णय अंमलात आणायला हवा होता, असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. कदम यांच्याकडे असलेल्या खात्याअंतर्गत अनेक गोष्टी येतात. त्यामध्ये नद्यांचे प्रदूषण करणारे, अनधिकृत झोपड्या बांधणारे यांच्यावर कारवाई का होत नाही ? असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. प्लास्टिक बंदीमुळे उगीचच सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले