वृक्षलागवडीच्या जनजागृतीसाठी चित्ररथ
अहमदनगर : जिल्हास्तरावर वृक्षलागवडीच्या व्यापक उपक्रमाच्या जनजागृतीसाठी वनविभागाने चित्ररथ तयार केला आहे. संपूर्ण शहरभर आणि चौकांचौकांत त्याचप्रमाणे शाळा-महाविदयालयांत या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक एम. आदर्श रेड्डी यांनी दिली. यावेळी हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, मुकुल गंधे, सुरेश खामकर, अशोक असेरी, सामाजिक वनीकरणाचे वनपरीक्षेत्र अधिकारी कैलास माळी, वनपाल देविदास पातारे, वैशाली दराडे, सचिन शिंदे, अक्षय ढोले, कुराण पुंड आदी उपस्थित होते.
